प्रेरणादायक Success motivation in Marathi | Powerful Marathi Motivation of 2024

प्रेरणादायक Success motivation in Marathi | Powerful Marathi Motivation of 2024

Success motivation in Marathi: तुला वाटते तू हरला आहेस आणि मनातल्या मनात स्वतःच्या स्वप्नांना मारले आहेस, का असफलतेच्या फांदीवर झोका घेऊ इच्छितोस? का तू स्वतःच्या स्वप्नांना विसरू इच्छितोस? का स्वतःच्या क्षमतेला तू ओळखत नाहीयेस? जर बिल गेट्स देखील तुझ्याप्रमाणे विचार करते असते तर आज तू मायक्रोसॉफ्ट ला ओळखत देखील नसता.

मला यश मिळत नाहीये, मला सफलता मिळत नाहीये, मी किती मेहनत घेतो आहे तरी देखील माझे ध्येय माझ्यापासून खूप दूर आहे. तुमच्याही मनात अशा काही गोष्टी येत नाहीयेत ना? का तुम्हाला देखील असे नाही ना वाटायला लागले की जीवनात सफलता मिळवणे आणि सुखी राहणे तुमच्यासाठी खूप जास्त कठीण झाले आहे? तर एक वेळेसाठी तुमचे डोळे बंद करा, आणि विचार करा की तुमचे जीवनात एकच लक्ष आहे की वर्ल्ड रेकॉर्ड बनवणे!

हा वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. आता तुम्ही म्हणाल की वर्ल्ड रेकॉर्ड बनवणे काही सोपे काम नाही, तर मग मला या गोष्टीचे उत्तर द्या की या जगात जे काही वर्ल्ड रेकॉर्ड बनलेले आहेत ते सर्व कोणी बनवले आहेत? …. मनुष्यानेच ना! आणि भविष्यात देखील जे सर्व रेकॉर्ड बनतील ते देखील मनुष्याद्वारेच बनवले जातील. साधारण आणि सामान्य तुमच्या सारख्या मनुष्याद्वारेच बनवले जातील.

विचार करा की तुमच्यासारखेच लोक जर वर्ल्ड रेकॉर्ड बनवत असतील तर या जगात असे काय आहे जे तुम्ही करू शकत नाही? तुम्ही मनावर घेतले तर तुम्ही कोणताही रेकॉर्ड तोडू शकता, कोणताही रेकॉर्ड बनवू शकता. तुम्ही कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकता, फक्त कमी आहे ती मेहनत करायची! जर तुम्हाला पाण्याचा एक ग्लास भरायचा आहे आणि तो 250 ml चा आहे तर तुम्हाला त्यात 250 ml च पाणी भरावे लागेल, तेव्हाच तुम्ही त्याला पूर्णपणे भरू शकाल. जरा देखील पाणी कमी राहिले तर तो ग्लास पूर्ण भरणार नाही आणि तुम्हाला तो ग्लास भरण्याच्या कार्यात देखील सफलता मिळणार नाही.

याच प्रकारे तुमचे जे ध्येय आहे त्याला पूर्ण करण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी जितकी मेहनत लागणार आहे, जितका हार्डवर्क लागणार आहे तितका तुम्हाला करावाच लागेल. ध्येयाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जितके प्रयत्न आणि वेळ हवा आहे, तितके प्रयत्न आणि वेळ तुम्हाला त्यासाठी दयावेच लागणार आहेत. जर थोडी देखील कमतरता राहिली तुमच्या प्रयत्नांत, तुमच्या मेहनतीत तर तुम्हाला ते मिळणार नाही जे तुम्हाला हवे आहे. तुम्हाला जे देखील टार्गेट पूर्ण करायचे आहे त्यावर निशाणा लावा, जसे जसे सकारात्मक विचारांच्या सोबत योग्य दिशेने तुम्ही काम करत जाल तस तसे तुम्ही ध्येयाच्या जवळ पोहोचत जाल. जसं जसे तुम्ही हे सातत्याने करत जानार तर तो दिवस दूर नाहीये जेव्हा तुम्हाला विजेता म्हणले जाईल!

तर उशीर का करताय, उठा आणि तयार व्हा , आता तुम्हाला यश मिळवायचे आहे, आता तुम्हाला विजेता बनायचे आहे! कोणाचीही मदत न घेता तुम्हाला ते करून दाखवायचे आहे जे लोक विचार देखील करू शकत नाहीये. व्हिडिओच्या शेवटी हेच सांगेल की जर वेळेची तुम्ही इज्जत कराल तर जग तुमच्या सोबत चालेल, जेव्हा तुम्ही परिपूर्ण बनाल तेव्हा तुमचे नाव इतिहासात जोडले जाईल. या जगात राहून तुम्हाला लढावं लागेल, आणि तुमचे नाव करोडो लोकांच्या गर्दीत वेगळे बनवावे लागेल.

काहीच नाही बनू शकणार जर असंच घाबरत राहिलास, जेव्हा तू काहीतरी मोठं करशील तेव्हा हे विश्व तुझ्या मुठीत असेल. जर जीवनात काही मोठं करायचं असेल तर उपाशी देखील रहावे लागेल, पराभवाचा त्रास देखील सहन करावा लागेल, वेळ जर कठीण असेल तर स्वतःशी बोलावे लागेल की “आय एम द बेस्ट”!

सकारात्मक विचारांच्या सोबत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत रहा.

All the Best

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “प्रेरणादायक Success motivation in Marathi | Powerful Marathi Motivation of 2024”

Leave a Comment