डोळे उघडून बघा | Eye Opening Motivation in Marathi 2024
Eye Opening Motivation in Marathi: कर्म हे असे हॉटेल आहे जिथे ऑर्डर देण्याची गरज नाहीये, इथे तेच मिळते जे आपण बनवलेले असते. सकाळी उठणे किती साधे आहे परंतु प्रत्येक व्यक्ती नाही उठू शकत कारण असे करणे साधे तर आहे मात्र सोपे नाही! अभ्यास करणे, पुस्तके वाचणे किती साधे आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती नाही वाचू शकत! कारण हे सुद्धा साधे तर आहे परंतु सोपे नाही. तर मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे तर साधे आणि सोपे यातील फरक समजून घ्या. तुम्हाला स्वतःला आठवन करून द्यावी लागेल की जीवनात तुम्ही पुढे जायचे आहे की नाही?
तुमच्या सभोवताली असणारे तुमचे मित्र यांना ही गोष्ट लक्षात येते की नाही, या गोष्टीने काही फरक पडत नाही. ते जीवनात पुढे जाऊ इच्छित आहेत की नाही, या गोष्टीने काही एक फरक पडत नाही. जर तुम्ही त्या अंधळ्या लोकांनी घेरलेले आहात, ज्यांना जीवनात काय करायचे आहे हे दिसतच नाही, तर काही फरक पडत नाही. परंतु लक्षात ठेवा की अंधांच्या गर्दीत जेव्हा डोळे असलेला जातो तेव्हा सर्वांना त्रास होतो.
जेव्हा तुम्ही जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न नक्की करतील, तुमच्यावर कंमेंट्स करतील, त्रास देतील, खिल्ली उडवतील! तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही अंध आहात का? वेडे आहात का? उत्तर भेटेल नाही! जे लोक तुमची चेष्टा करत आहेत, जे लोक तुम्हाला नाव ठेवत आहेत, तुम्हाला स्वतःपासून वेगळे करत आहेत, त्यांच्यासाठी स्वतःशी एक प्रश्न विचारून बघा की हे लोक आंधळे आणि वेडे आहेत का? तर उत्तर येईल हो! हे लोक आंधळे आणि वेडे आहेत. मग स्वतःशी एक शेवटचा प्रश्न विचारून घ्या, की वेड्यांच्या बोलण्याने कोणी वाईट मानून घेते का? उत्तर येईल नाही! वेड्यांचे बोलणे कोणी मनावर घेत नसते तर वाईट का मानून घेईल. आंधळ्या कडे कोणी रस्ता विचारत नाही आणि अनुभव नसलेल्या कडून कोणी सल्ला घेत नाही. मित्रा ज्या दिवशी तुझे विचार दुसऱ्यांपेक्षा उच्च झालेले असतील, ज्या दिवशी तुम्ही इतरांचे खरे रूप समजून घेतले त्या दिवशी तुम्ही काहीही न करता बाकी लोकांच्या पुढे निघून जाल.
हे खूप मोठे सत्य आहे की जेव्हा विचार पुढे निघून जातात, तेव्हा मनुष्याला खूप पुढे घेऊन जातात. आणि जेव्हा विचार छोटे राहतात तेव्हा मनुष्याला खूप मागे घेऊन जातात. मी या सर्व गोष्टी अशाच बोलत नाहीये, हे माझे अनुभव बोलताय. तुमचे विचार मोठे करून बघा, तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील की तुम्ही स्वतः हैराण होऊन जाल. छोटे विचार हे बुटात गेलेल्या छोट्या दगडासारखे असतात, हे रस्त्यावर असणाऱ्या दगडांपेक्षा जास्त त्रास देते. आपण बाहेरच्या संकटांपासून नाही तर आतल्या कमजोरी मुळे पराभूत होतो.
मित्रांनो तुम्हाला हा Eye Opening Motivation in Marathi चा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा