स्टीफन हॉकिंग यांची जबरदस्त प्रेरणादायी कथा | Stephen Hawking Information in Marathi | Stephen Hawking Biography in Marathi
जगात अशक्य असं काहीच नाही हे वाक्य तंतोतंत ज्यांना लागू होत ते महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, ज्यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.
हळूहळू शरीराचे सगळे भाग निकामी होत गेले पण फक्त दृढ इच्छाशक्ती आणि मानसिक कणखरतेच्या जोरावर त्यांनी ब्रह्मांडामधले मोठे मोठे शोध लावले. त्यांचं म्हणणं होत कि आयुष्य एकदाच भेटते. मी मागील जन्मावर किंवा पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. मला जे काही करायचे ते ह्याच जन्मात करायचे. अश्या महान शाश्त्रज्ञाच्या आयुष्याचा आढावा आपण घेणार आहोत कारण तुम्हाला कुतूहल असेल कि शरीराचे एवढे भाग निकामी होत असताना त्यांनी हे शोध लावले कसे ? त्यांनी ह्या संकटावर मात केली कशी ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी ह्या विडिओ मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे.

चला तर मग सुरु करूयात,
हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंड मधील ऑक्सफर्ड इथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर फ्रॅंक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई एलिझाबेथ ऑक्सफर्ड ची पदवीधर होती. हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. त्यांची बुद्धिमत्ता अवधी प्रचंड होती कि त्यांना लहानपणी आईन्स्टाईन ह्या नावाने ओळखले जायचे आणि योगायोग हा कि ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्याच दिवशी आईन्स्टाईन यांचा वाढदिवस होता.
गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यायचे होते पण त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन मेडिकल साईड घ्यावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. १९५९ साली त्यांनी कॉस्मॉलॉजि हा विषय घेऊन प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना scholarship सुद्धा मिळाली. हॉकिंग जेव्हा सुट्टीसाठी घरी आले होते तेव्हा एक दिवस घरातील पायरी उतरताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. डॉक्टर नि थोडा अशक्तपणा असल्याचे सांगितले. तेव्हा ते २१ वर्षाचे होते पण दिवसेंदिवस त्यांची तब्येत आणखी खराब होत गेली तेव्हा डॉक्टर नि सांगितले कि त्यांना neuron motor हा आजार आहे. ज्याच्यामुळे शरीराचे अवयव हळूहळू काम करायचे बंद करतात आणि मग श्वसननलिका बंद झाली कि माणूस मरतो.
डॉक्टरनी सांगितले कि स्टिफन जास्तीत जास्त २ वर्ष जगतील. हे ऐकून स्टीफन थोडे उदास झाले पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि ते म्हणाले मी २ वर्ष नाही २० वर्ष नाही तर ५० वर्ष जगणार आहे आणि बघा ह्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर ते ७६ वर्षाचे आयुष्य जगून गेले. १९६३ मध्ये त्यांचे दोन्ही पाय काम करायचे बंद झाले. १९७० मध्ये हाथ निकामी झाले. १९८५ मध्ये त्यांना Pneumonia झाला. डॉक्टर म्हणाले कि श्वासनलिकेत छिद्र करूनच ऑपेरेशन करावे लागेल मग तशी शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली मग त्यामुळे ते आपला आवाज कायमचा गमवून बसले.
आता ते ना चालू शकत होते ना कोणाशी बोलू शकत होते. एक जिवंत बॉडी शिल्लक राहिली होती पण एक मात्र होत कि त्यांचा मेंदू खूप actively काम करत होता. १९९० साली त्यांच्या बोटांनी काम करायचे बंद केले. १९९६ साली त्यांच्या ९२% शरीराने काम करायचे बंद केले. ज्यावेळेस त्यांचे पाय आणि हाथ निकामी झाले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना व्हील-चेअर वापरायला सांगितले तेव्हा त्यांच्या व्हीलचेअर ला कॉम्प्युटर जोडण्यात आला. ते फक्त बोटाच्या साहाय्याने आपल्याला काय म्हणायचे ते कॉम्प्युटर द्वारे सांगत होते. त्यावेळेस ते एका मिनिटाला १५ शब्द सांगू शकत होते. काही दिवसांनी त्यांच्या बोटांनी सुद्धा काम करायचे बंद केले पण तरी त्यांनी हार मानली नाही, तेव्हा त्यांच्या कॉम्प्युटर वर असा एक सेन्सर बसवला होता जो गालाच्या हालचालीवर सांगायचाकि हॉकिंग यांना काय म्हणायचंय. तेव्हा ते १ मिनिटाला एकच शब्द सांगू शकत होते.
काय म्हणावे त्या जिद्दीला, काय म्हणावं ह्या चिकाटीला! विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात अश्या ब्रह्मांडामधल्या अनेक ना उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि असामान्य बुद्धिकौशल्याचा जोरावर माणूस जग जिंकू शकतो हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिल. त्यांनी ब्लॅक होल्स, बिग बँग थेअरी, हॉकिंग रेडिएशन वर जास्तीत जास्त research केला.
ब्लॅक होल्स म्हणजे जे तारे म्हातारे होतात त्यांच्या जवळ जबरदस्त गुरुत्वाकर्षण निर्माण होते जे प्रकाशाला पण ओढते आणि ह्या होल्स मधून काही रेडिएशन्स निर्माण होतात हा शोध त्यांनी लावला होता म्हणून त्यांना हॉकिंग रेडिएशन म्हणतात. त्यांना १२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत.
त्यांनी ४ पुस्तके लिहिली जी सर्वच बेस्टसेलर ठरली पण सर्वात त्यांचं पुस्तक हिट ठरलं ते म्हणजे ‘A Brief History of Time’.
मित्रांनो स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केली कि माणूस दुर्बल असतो तो केवळ मानसिक दुर्बलतेमुळे आणि मजबूत असतो तो फक्त आपल्या कणखर मानसिकतेमुळे. सर्व आपल्या विचार आणि मनावर अवलंबून असते. तुम्ही दिसायला कसे आहात, तुमच्यामध्ये काही कमी आहेत, अपंगत्व आहे काही फरक पडत नाही. तुम्ही मनानी कणखर आणि मजबूत असाल तर ह्या जगात काहीही साध्य करू शकता.
मित्रांनो मला अशा आहे आता तुम्हाला Stephen Hawking Biography in Marathi या लेखाच्या माध्यमातून Stephen Hawking यांच्याबद्दल जाणून घ्यायला मदत झाली असेल.
Stephen Hawking Information in Marathi वरील हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
खूपच छान
you’re welcome
जगातले खुपचं धेर्यवान शास्त्रज्ञ म्हंटले जाते,
ते म्हणजे Dr. Stephen hawking.
खडतर आयुष्यातून जीवनाचा मार्ग असा काडून जावे , की ते पूर्ण जगाला चिंतेत टाकून तर जातेच, परंतु आयुष्याच्या वाटेवर
जीवन कसे जगावे, हे आपल्या धेर्यावर,आणि चिकाटीवर अवलंबून असते.
हे समजून देते.