360+ Latest Ukhane in Marathi for Male for Marriage 2024

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

360+ Latest Ukhane in Marathi for Male for Marriage 2024

मित्रांनो आपल्या मराठी संस्कृतीमध्ये गोड मराठी उखाण्यांना एक विशेष स्थान आहे. आणि जर तुम्ही लग्न करताय तर एक उखाणे तर यायलाच पाहिजे. Marathi Ukhane हि आपल्या महाराष्ट्रातील जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. आणि लग्नसमारंभात तर वर आणि वधूने उखाणा घेल्याशिवाय लग्नाची विधी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही.

मित्रांनो लग्नसमारंभात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उखाणा घेत असतो, आणि उखाण्यांमुळे लग्नातील वातावरण अजून आनंदी आणि प्रसन्न होऊन जाते. कारण हीच संधी असते आपल्या होणाऱ्या बायकोला आपले प्रेम व्यक्त करण्याची, त्यामुळे तुम्ही सुद्धा जर उखाण्यांच्या शोधात असाल तर Latest Ukhane in Marathi for Male for Marriage या लेखात दिलेले २-३ उखाणे पाठ नक्की करून ठेवा.

Latest Ukhane in Marathi for Male for Marriage

Latest Ukhane in Marathi for Male for Marriage
Latest Ukhane in Marathi for Male for Marriage

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
——- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
——- च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
——-च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.

——-च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
——-ला पाहून, पडली माझी विकेट.

देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
——- मुळे झाले संसाराने नंदन.

Marriage ukhane in Marathi for male

Marriage ukhane in Marathi for male
Marriage ukhane in Marathi for male

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान
——-च्या रूपाने, झालो मी बेभान.

कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड
——-ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
——- चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी, पेढे,
——-चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ——-
सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

 Lagna ukhane in Marathi for male

 Lagna ukhane in Marathi for male
Lagna ukhane in Marathi for male

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
——-च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो ——-ला जलेबी चा घास.

पोर्णिमेचा चंद्र असतो गोल
——-समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.

कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव,
——-चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.

डाळीत डाळ, तुरीची डाळ,
——-च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.

Latest ukhane in Marathi for male

Latest ukhane in Marathi for male
Latest ukhane in Marathi for male

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन ——- ने दिला माझ्या हातात हात.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी
——-व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

प्रेमाच्या राणात, नाचतो मोर,
——-शी केल लग्न, नशीब माझ थोर.

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ——-च्या, गालावरचा तीळ.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
——- च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

Marathi lagnache ukhane for male

Marathi lagnache ukhane for male
Marathi lagnache ukhane for male

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
——-च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
——-च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
——- मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
——-च्या सहवासात झालो मी धुंद.

Marathi mulansathi ukhane

Marathi mulansathi ukhane
Marathi mulansathi ukhane

उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे,
——-चे नाव, कायम ओठी यावे.

गर गर गोल, फिरतो भवरा,
——- च नाव घेतो, मी तिचा नवरा.

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,
——- चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई,
——-च नाव घेऊन, मला घरात जायची लगली आहे घाई.

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
——-ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

Romantic Ukhane in Marathi for Male

Romantic Ukhane in Marathi for Male
Romantic Ukhane in Marathi for Male

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, ——- च्याच प्रेमात पडतं.

विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,
——- अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.

पार्ले ची बिस्कीटे बेडेकरंचा मसाला,
——- नाव घ्यायला आग्रह कशाला.

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,
——- माझी झाल्यापासून जळतात लोक सारी.

Marathi ukhane for male wedding

झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,
शोभून दिसते, ——- आणि माझी जोडी.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
——- चे नाव घेतो ——- च्या घरात.

मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध,
——- च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
——- ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

Marathi navardevache ukhane

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
——- ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
——- चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल
——-च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
——- आहे माझे जीवन-सर्वस्व.

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
——- च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.

Top Navardevache ukhane marathi for Male

Top Navardevache ukhane marathi for Male
Top Navardevache ukhane marathi for Male

पुरणपोळीत तूप असावे साजूक,
——- आहेत आमच्या नाजूक.

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
——-च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

पिवळ्या धम्मक साडीची दिली मी तिला भेट,
अन, ——- साठी कायम खुल माझ्या मनाचं गेट.

तुझ्या माझ्या प्रेमाच्या प्रवासात मोह,
माया कसलीच नसावी.
अन् आयुष्यातील पुढील प्रत्येक क्षणांची
सोबत ही फक्त, ——- चीच असावी.

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी,
——- च नाव घेतो मी तिचा राजा अन् ती माझी राणी.

Navardevache comedy ukhane marathi

Navardevache comedy ukhane marathi
Navardevache comedy ukhane marathi

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं, ——- च्याच हातात Steering.

एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
——- च नाव घेतो, डोकं नका खाऊ.

पाहताच ——- ला, जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.

तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता ——- च्या प्रेमात पडली माझी विकेट.

मित्रांनो उखाणे घेणे कि एक फक्त परंपरा नसून ती आपल्या मराठी आणि आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. ती जपणे आणि पुढे घेऊन जाणे हे आता आपले कर्त्यव्य आहे, त्यामुळे लग्न असो किंव्हा दुसरे कोणतेही शुभ कार्य, कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितलं तर न लाजता एक उखाणा बिन्दास्त घ्यायचा. तसेच Latest Ukhane in Marathi for Male for Marriage या लेखात दिलेल्या मराठी उखाण्यांपैकी तुम्हाला कोणता उखाणा आवडला मला कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Love Birthday Wishes in Marathi

Marathi Mangalashtak Lyrics

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा