वायू प्रदूषण | Vayu Pradushan Marathi Nibandh | मराठी निबंध

वायू प्रदूषण | Vayu Pradushan Marathi Nibandh

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत मानवी गरजा आहेत. अन्न ही संज्ञा फार व्यापक अर्थाने वापरली जाते, कारण यात अन्नधान्या बरोबरच पाणी आणि हवा या महत्त्वाच्या घटकाचा समावेश अप्रत्यक्षपणे झालेला आहे. जिवंत रहाण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा व्हावा लागतो.

प्रकृती निकोप राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि शुध्द हवेची आवश्यकता आहे. हवेतील प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो.

हवा वेगवेगळया वायूंच्या मिश्रणाने बनली आहे. त्याचे प्रमाण सर्वसाधारण परिस्थितीत कायम असते. यापैकी काही घटक आपल्याला आवश्यक असतात, काही निरूपयोगी असतात तर काही घातक असतात. आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त व अनावश्यक घटकांचे प्रमाण कमी राहून त्या दोहोत नैसर्गिक समतोल राखला गेलेला असतो.

नायट्रोजन:

नायट्रोजन हा हवेतील मुख्य घटक आहे. तो निसर्गात मोठ्या प्रमाणावर मुक्त स्थितीत आढळतो. नायट्रोजन हा रंगहीन वायू असून त्याला वास व चव नसते. तो विषारी नाही. तो पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. नायट्रोजन वायू विषारी नसला तरी अधिक दाबाखाली, माणसाच्या शरीरात गेल्यास वेड्यासारख हसू लागतो. व त्यांच्या १०% वातावरणीय दाबाने बेशुध्दी आणि मृत्यू संभोवतो.

विजा चमकत असताना, वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजीन यांचा संयोग होऊन नायट्नीक ऑक्साईड ( छज २ ) तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्न्स ऑक्साइड ि कछज३ र्े आणि नायट्नीक अॅसिड तयार होतात. ती अत्यंत विरल स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर आणली जातात. त्यांची जमिनीवर आम्ल धर्मी पदार्थांशी अभिक्रीया होते आणि शेवटी नायट्रेट क्षार तयार होतात. त्याचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. वनस्पतिज अन्नातून प्राण्यांना नायट्रोजन मिळतो.

स्थिरीकरण झालेल्या नायट्रोजन, संयुगांच्या विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातो. हे कार्य विनायट्नीकरण जिवाणू घडवून आणतात. जमिनीतील नायट्रोजन युक्त पदा यांचे हे जिवाणू विघटन करतात आणि मुक्त नायट्रोजन हवेत मिसळला जातो. तसेच लाकूड, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष हवेत जळले असता त्यातील नायट्रोजन मुक्त होऊन हवेत मिसळतो. अशा प्रकारे निसर्गामध्ये नायट्रोजनचे चक्र अव्याहत चालू असते.

प्राण वायू :-

प्राण वायू हा हवेतील महत्त्वाचा घटक आहे. प्राणवायू विना माणूस पाच मिनीटे देखील जगणे शक्य नाही. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण २१% असते. ते १०% कमी झाल्यास लगेच मृत्यू ओढवतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. या मुळे गोंधळलेली अवस्था गुंगी येणे, मृत्यू येणे असे प्रकार घडतात. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतील ऑक्सिजन कमी करतात.

कार्बनडाय ऑक्साईड :-

हवेत कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण ०.०३% इतके असते. कार्बन आणि त्याच्या संयुगांच्या जळण्याने कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होतो. हा वायू हवेपेक्षा जड आहे. वनस्पती, माणूस व इतर सर्व प्राण्यांच्या श्वसनाच्या क्रियेत कार्बनडाय ऑक्साईड मुक्त होतो, माणूस एका दिवसात साधारण ४०० लिटर कार्बन डायऑक्साईड उच्छ्वासावाटे बाहेर टाकतो. लाकूड, कोळसा, तेल आणि गॅस इ. प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनात दर वर्षाला ३० अब्ज टनांपेक्षा अधिक कार्बनडायऑक्साईड वातावरणात विलीन होतो. कार्बनडायऑक्साईड हा वनस्पतींच्या पोषणातला मुलाधार आहे. निसर्गामध्ये ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे कोट्यावधी टन कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकला जातो. कार्बनडायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील उर्जेचा समतोल ढळतो व भुपृष्ठावरील असलेल्या वातावरणाचे तपमान वाढते. वातावरणातील तपमानामुळे हवामान व पाऊस यांच्यामध्ये बदल होतो.

हवा प्रदूषणाचे वर्गीकरण दोन गटामध्ये केले आहे. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषण व दुसरे म्हणजे अनैसर्गिक किंवा मानवी प्रदूषण.

प्रचंड येणारी वादळे यामुळे हवेत धुळीच्या सुक्ष्मकणाचे प्रमाण वाढते. उल्कापातामुळे ज्वलन क्रिया घडुन कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्वालामुखीमुळे वातावरणात अमोनिया व गंधकाची वाफ यांचे प्रमाण वाढते व हवा दूषित होते. या सर्वांचा समावेश नैसर्गिक प्रदूषणात होतो

मानवी प्रदूषणात ज्या ज्या मानवी क्रियेमुळे हवेचे प्रदूषण होते त्या क्रियांचा समावेश होतो. सतत धुर ओकणारे कारखाने, अपायकारक वायू सोडणारी वाहने, विमाने, कीटक नाशके, जंतूनाशके यांचे सोडलेले फवारे, अणुबाँब सारखे शास्त्रीय प्रयोग इत्यादी सर्वांचा समावेश मानवी प्रदूषणामध्ये होतो.

वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणार्या प्रदूषणात कार्बनमोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल यामुळे दोन तृत्यांश सल्फर डायऑक्साइड तयार होतो. पेट्रोरसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते.

अंतराळात जाण्यासाठी जो अग्निबाण वापरतात त्याच्या धुरातूनसुध्दा क्लोरोफ्ल्युरोकार्बन सारखी संयुगे वातावरणात कोणाशीही संयोग करत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत. किंवा समुद्रात सुध्दा शोषून घेतली जात नाहीत. अशाच प्रकारची संयुगे आवाजापेक्षा वेगाने जाणार्या विमानातुनसुध्दा बाहेर टाकली जातात. अग्निबाण व ही विमाने स्थित्यंतरामधून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा धुर वातावरणाच्या या स्तरात मिसळला जातो. येथे ही संयुगे(क्लोरोफ्ल्युरो कार्बन) प्राणवायूच्या अणुबरोबर संयोग करून क्लोरीनचा अणू वेगळा करतात. हा क्लोरीनचा अणू ओझोनच्या रेणूशी प्रक्रिया करतो व त्याला तोडतो. यामुळे ओझोनचे पृथ्वी भोवतीचे कवच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा वायू प्रदूषण (Vayu Pradushan Marathi Nibandh) आवडला असेल.

लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा Air Pollution Marathi essay वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा बालदिन वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

हे देखील वाचा

Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “वायू प्रदूषण | Vayu Pradushan Marathi Nibandh | मराठी निबंध”

Leave a Comment