Pustakache Mahatva Marathi Nibandh | Importance of Books Essay in Marathi

Pustakache Mahatva Marathi Nibandh | Importance of Books Essay in Marathi

Pustakache Mahatva Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या या लेखात मी घेऊन आलो आहे, पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध.

पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना, पुस्तके आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती देतात, आपले ज्ञान वाढवतात, नवीन शब्दाची ओळख करून देतात, पुस्तके आपणास विचार करायला लावतात, आपल्या विचारांना नवी दिशा देतात. पुस्तके हे आपले मनोरंजन देखील करतात पुस्तके हि आपल्या मित्रासारखी नेहमी आपल्या सोबत राहतात.

आपण घरात एकटे असलो आणि कंटाळा आला वेळ जात नाही, एखादे पुस्तक काढून वाचायला सुरुवात करा, वेळ कसा मजेत जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही पुस्तक केवळ गोष्टीचे असते असे नाही. थोर व्यक्तींची चरित्रे, प्रवास वर्णन, काव्यसंग्रह, नाटके, कथासंग्रह कादंबऱ्या, ऐतिहासिक, वैज्ञानिक व निसर्गाशी संबंधित असणारी अशी अनेक पुस्तके आहेत. पूर्वी पुस्तके नव्हती छपाई यंत्राचा शोध हि लागलेला नव्हता तेव्हा ही माणसे एकमेकांना संदेश, निरोप पाठवत असत व आपले विचार आठवणी लिहून ठेवत असत. काही ठिकाणी दगडावर माहिती कोरून लिहून ठेवली जात असे, ज्याला शिलालेख असे म्हटले जाते.

त्यानंतर कागदाचा शोध लागला मग छपाई यंत्राच्या मदतीने या कागदावर छपाई केली जाऊ लागली आणि यांनाच पुढे पुस्तके असे म्हटले जाऊ लागले. मित्रांनो या पुस्तकांना केवळ पुस्तकच नाही तर ग्रंथ, पोथी असे देखील म्हणतात. आता आपण संगणकावर ही पुस्तक वाचतो किंवा पाहतो संगणकावरील पुस्तकांना आपण ई-पुस्तक किंवा ई बुक असे म्हणतो पूर्वीची छापील पुस्तके व आजची ई बुक हा पुस्तकाच्या स्वरूपात होत चाललेला बदल आहे तरी पुस्तके ही काल देखील होती , आज देखील आहेत आणि उद्या देखील असतील.

Importance of Books Essay in Marathi
Importance of Books Essay in Marathi

बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते की, मी नरकात देखील पुस्तकांचे स्वागत करेन कारण  पुस्तकांमध्ये अशी शक्ती आहे की, जिथे पुस्तके असतील त्या ठिकाणी स्वर्ग होईल, टिळकांच्या या शब्दांवरून स्पष्ट झाले आहे की पुस्तके केवळ एक साधन नाहीत तर ज्ञान आणि आनंद वाढवण्यासाठी आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात.

गांधीजींनी म्हटले होते की जुने कपडे घाला आणि नवीन पुस्तक वाचा. पुस्तके वाचून, एखादी व्यक्ती स्वत:च्या जीवनातील प्रत्येक अडचणी वर मात करून एक प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून सकारात्मकतेकडे जाऊन जीवनात एक नवीन दिशा निर्माण करू शकते.

पुस्तके वाचणे हा एक छंद आहे आणि तो बालपणात विकसित झाला पाहिजे, ज्या व्यक्तीला बालपणापासूनच पुस्तके वाचायला आवडतात त्या व्यक्तीला आयुष्यभर कधीही एकटेपणा वाटणार नाही आणि तो व्यक्ती नेहमीच उत्साही राहील, म्हणून लहान मुलांना पुस्तकांचे महत्त्व देखील पटवून देणे गरजेचे आहे.

Importance of Books Essay in Marathi
Importance of Books Essay in Marathi

इतिहास जाणून घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट आणि विश्वसनीय स्त्रोतांमध्ये पुस्तकांची महत्त्वाची भूमिका आहे. या पुस्तकांनीच जुन्या सभ्यता किंवा संस्कृतीचा इतिहास आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. परंपरा हे पूर्वजांनी दिलेले ते ज्ञान आहे जे नवीनतम तंत्रज्ञानापासून मिळवणे फारच कठीण आहे.

पुस्तक वाचल्याने आपला ताण कमी होण्यास मदत होते. पुस्तक वाचल्याने आपली स्मरणशक्ती मजबूत होते. वाचन केलेल्या एकाग्रता वाढविण्यात मदत होते. नियमित पुस्तक वाचल्याने, आपला आत्मविश्वास वाढू लागतो. पुस्तक वाचत वाचत झोपल्याने छान झोप येते. पुस्तके देखील मनोरंजनाचे साधन बनू शकतात. आपण आपल्या मोकळ्या वेळात एखाचे गोष्टीचे पुस्तकाचे वाचन करून स्वतःचे मनोरंजन करू शकता.

पुस्तके हि आपली खरी मित्र आहेत, ती आपल्याला सुसंस्कृत होण्यास मदत करतात. पुस्तक आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा पुस्तके आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला योग्य निर्णय घायचा सल्ला देतो. आज खुप सारी जुनी  मंदिरे आणि किल्ले नष्ट झालेली आहेत , परंतु आपल्या पुस्तकांमध्ये प्रत्येक गोष्ट खूप सुरक्षित आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आपल्या इतिहासाबद्दल सर्व माहिती भेटते. गीता, रामायण इत्यादी पुस्तके वाचून मनाला शांततेचा अनुभव होतो.

आज पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रत्येक विषयाचे स्वतःचे पुस्तक असते आणि ते सुद्धा तुम्हाला कळेल त्या भाषेमध्ये . जेणेकरून आपल्याला कोणतीही शंका मनात राहणार नाही व आपण आपल्या आवडत्या विषयाबद्दल ज्ञान मिळू शकू. पुस्तके आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्यामध्ये लिहिलेले प्रत्येक गोष्ट आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर नक्कीच उपयुक्त ठरतात. पुस्तकांचे आपल्या जीवनात खूप महत्वाचा वाटा आहे, ते आपल्याला योग्य ज्ञान देऊन एक चांगली व्यक्ती बनवायला मदत करतात.

FINAL Words

तर मित्रांनो मला अशा आहे Pustakache Mahatva Marathi Nibandh वाचून तुम्हाला आता पुस्तकाचे महत्व आपल्या आयुष्यात किती मोठे आहे याची कल्पना आली असेल. Importance of Books Essay in Marathi या लेखात तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला काही नवीन माहिती update करायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh

Maza Avadta Sant Essay in Marathi

Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh

The Importance Of Books In English

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment