Maza Avadta Sant Essay in Marathi। Majha Avadta Sant Nibandh
विद्यार्थीमित्रांनो जर का तुम्ही Maza Avadta Sant Essay in Marathi च्या शोधता असाल तर मी आजच्या या लेखात Majha Avadta Sant Nibandh Sant dnyaneshwar यांच्या वर सूंदर निबंध घेऊन आलो आहे. तुम्हाला हा निबंध वाचून ज्ञानेश्वरांबद्दल अजून जाणून घायला मदत होईल.
मित्रांनो आपली भारत भूमी ही महान संतांची भूमी मनाली जाते कारण आपल्या या संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. आपल्या महाराष्ट्रात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत रामदास असे अनेक थोर संत होऊन गेले आहेत. सर्व संतांची शिकवणूक सारखीच असते पण माझ्या सर्वात आवडीचे संत व कवी आहेत संत ज्ञानेश्वर.
संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते. संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकित प्रतिभा असणारे महान मराठी संत होते त्यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये औरंगाबाद म्हणजे ज्याला आता संभाजीनगर या नावाने ओळखले जातं तर या संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव होते रुक्मिणीबाई व वडिलांचे नाव विठ्ठलपंत हे होते.
संत ज्ञानेश्वर वडिलांनी सन्यास घेतला होता पण काही वर्षांनी विठ्ठल पंत हे पुन्हा गृहस्थ श्रमात परतले होते गृहस्थ श्रमात परतल्यानंतर त्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही चार मुले जन्मली होती. ज्ञानेश्वरांना लहान पाणापासूनच खूप साऱ्या संकटांना सामना करावा लागला, त्याच्या कडे राहायला साधी झोपडी देखील न्हवती. त्यांना त्यांच्या जातीवरून बहिष्कृत केले गेले होते. संन्यासाचा मुलगा म्हणून ज्ञानेश्वरांना वाळीत देखील टाकले गेले. त्यावेळच्या समाजाने विठ्ठल पंत व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आतोनात छळ केला होता. समाजाच्या या हेटाळवणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी आत्महत्या करून प्रायश्चित केले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे अनाथ झाली त्यानंतर ते चारही जाऊन पैठणला पोहोचले.
ज्ञानेश्वरांनी पंधराव्या वर्षाच्या कमी वयात भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वतःला तल्लीन करून दिले संत ज्ञानेश्वरांना साक्षात्काराची प्राप्ती झाली. संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे मूर्तीमंत प्रतीक होते ते विठ्ठलाचे परभक्त होते ज्ञानेश्वरांनी लहानपणापासूनच लोकनिंदे कडे लक्ष न देता अध्यात्मिक प्रगती केली त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ “ज्ञानेश्वरीची” रचना केली.
ज्ञानेश्वरीने सर्व स्तरातील लोकांना भुरळ घातली. ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले. ज्ञानेश्वरीतील सुमारे 9000 ओव्यांतील भक्तीचा ओलावा व विचारांची संपन्नता अतुलनीय आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. ज्ञानसूर्य ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ अमृतानुभव हा स्वरचिथ ग्रंथ आहे. तत्त्वज्ञान दृष्टिकोनातून अमृतानुभव हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. “चांगदेव पासष्टी” या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी महान योगी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश दिला. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आजही घरात, मंदिरात श्रद्धेने लोक म्हणतात. ज्ञानेश्वरांनी 27 अभंगांतून सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा भाषेत हरिपाठ याची रचना केली आहे. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा उत्कृष्ट नामस्मरणाचा नाम पाठ आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात विश्व कल्याणासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहले.
संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्त्वज्ञानी संत कवी होते त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी इंद्रायणी नदीतीरी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांची समाधी आळंदी मधील सिद्धेश्वर या मंदिरच्या परिसरात आहे. संत ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आजही मन अचंबित होते.
Information about Sant Dnyaneshwar in Marathi
पूर्ण नाव | संत ज्ञानेश्वर |
जन्म | 1275, महाराष्ट्र |
आईचे नाव | रुक्मिणीबाई |
वडिलांचे नाव | विठ्ठल पंत |
प्रमुख ग्रंथ | ज्ञानेश्वरी, अमृतानुभव |
गुरु | निवृत्तीनाथ |
मातृभाषा | मराठी |
मृत्यू | 1296 मध्ये |
Final Words
तर विद्यार्थीमित्रांनो Maza Avadta Sant Essay in Marathi वर आमचा हा Sant Dnyaneshwar यांच्यावरचा निबंध कसा वाटला ते कंमेंट मध्ये नक्की सांगा.
हे देखील वाचा:
2 thoughts on “Maza Avadta Sant Essay in Marathi । Majha Avadta Sant Nibandh”